Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विस्ताराठी एशियन इन्फ्रास्ट्रचक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 50 कोटी डॉलर्सची मदत देऊ करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वेच्या मार्गाच्या विस्तारिकरणासोबत अपघातप्रवण भागातील विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. या बँकेची वार्षिक सभा मुंबईत झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारडून मुंबईतील उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या प्रकल्पांसाठी निधी देण्याबाबत बँकेपुढे प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार आता बँकेच्या संचालकांकडून निधी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत दररोज हजारोच्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. याचा आढवा बँकेचे अधिकारी पांडियन यांनी घेतला. त्यानुसार सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत रेल्वेचे जाळे 400 किमी पर्यंत पोहचलेले आहे. त्यामुळेच रेल्वेसंबंधित अन्य गोष्टींचा विचार करुन आर्थिक मदत करण्याच्या प्रस्तावर बँकेने मंजूरी दिली आहे. त्याचसोबत केंद्र सरकारच्या अखत्यारितील राष्ट्रीय पायाभूत सुविधा गुंतवणूक निधीमार्फत भारतात 290 कोटी डॉलर्स गुंतवणूकीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.(दादर मधील टिळक पूलाचे प्लास्टर कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित)

तर मुंबईतील काही अशी उपनगरीय रेल्वे मार्ग आहेत ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात. त्याबाबत सुद्धा बँकेने अभ्यास केला असून हे अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच विरार-डाहाणून रोडचे 64 किमी चौपदरीकरण आणि कर्जत-पनवेल 28 किमी नवा लोकल कॉरिडोरचे सुद्धा काम करण्यात येणार आहे.