गेल्या काही महिन्यांपूर्वी सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पूलांची दुरुस्ती करण्यात यावी असे सांगण्यात आले. त्यानंतर अद्याप त्यामधील क्वचितच पुलांचे काम नव्याने सुरु करण्यात आले आहे. मात्र दादर (Dadar) येथील टिळक पूल (Tilak Bridge) सुद्धा धोकादायक पूलांच्या यादी मध्ये असून त्याबाबत काम करण्यात आले नाही. बुधवारी दुपारच्या वेळेस या पूलाचे प्लास्टर कोसळून पडल्याचा प्रकार घडला. यामध्ये सुदैवाने कोणताही दुर्घटना झाली नाही. परंतु स्थानिकांमध्ये या प्रकारमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदू कॉलनीजवळील पूलाचा भाग कोसळला गेला. त्यानंतर आता पुढील चार दिवसात या पुलाचे काम करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. दादर मधील हा सर्वात जुना पूल असून तो दादर पश्चिम आणि पूर्व दिशेला जोडला गेला आहे. या पुलाची स्थिती धोकादायक असून ही महापालिकेकडून त्याचे काम करण्यासाठी आता कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.(वराती दरम्यान नाचताना पूल कोसळला, नवरदेवासह 15 जण नाल्यात)