मुंबईच्या विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टाकडून वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकिर नाईक (Zakir Naik) याच्या विरोधात नव्याने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. तर झाकिर नाईक यांचे वकील तारक यांनी दोन महिन्यांचा कालावधी कोर्टाकडे मागितला होता. परंतु कोर्टाने वकिलांनी केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. त्यानंतरच अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाइक यांच्या विरोधात 193.6 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आरोप लगावण्यात आला आहे. तर पीएमएलए कोर्टात ईडी कडून नाईक यांच्या विरोधात आरोपपत्र सुद्धा सादर केले होते.
झाकिर नाईक याच्या प्रत्यार्पणाबाबत मलेशिया पंतप्रधान महाथिर बिन मोहम्मद यांनी पुन्हा एकदा काही गोष्टीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. महाथिर मोहम्मद यांनी असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा झाकिर नाईक च्या प्रत्यार्पणा बद्दल कोणतीही गोष्ट बोलले नाही आहेत. भारताने जाकिर नाइक यांच्या प्रत्यार्पणासाठी जानेवारी महिन्यात मलेशिया सरकारकडे आग्रह केला होता.(मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये राडा; शिवसेनेच्या नगरसेवकांकडून स्थायी समितीच्या सभागृहाची तोडफोड)
तर 2018 मध्ये झाकिर नाईक याने भारतामधून पळ काढून मलेशियात स्थायिक झाला होता. त्यावेळी मलेशियामधील सरकारने त्याला स्थानिक नागरिक म्हणून त्याला नागरिकत्व देऊ केले होते. झाकिर नाईक याच्यावर मनी लॉन्ड्रींगची सुद्धा केस दाखल आहे. त्याचसोबत झाकिर नाईक याच्या विरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत मुस्लिम तरुणांना भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप सुद्धा लावण्यात आला आहे.