मुंबईतील सायन रुग्णालयात कोविड-19 वॉर्डमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबई महापालिकेने या संदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओत कथित रुपात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या शेजारी मृत शव सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. कारण भाजप पक्षाचे आमदार नितेश राणे यांना या व्हिडिओला लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. मात्र आता महापालिकेने या प्रकरणी एका समितीचे गठन केले असून पुढील 24 तासात अहवाल येईल असे सांगण्यात आले आहे.
कथित रुपात कोविड-19 वॉर्डमध्ये कमीत कमी अर्धा डझन शव बेडवर पडल्याचे व्हिडिओतून दिसून आले आहे. तेथेच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. मृतदेह काळ्या प्लस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळल्याचे दिसून येत आहे. काही मृतदेहांवर कापड टाकल्याचे ही दिसत आहे. नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करत असे म्हटले आहे की, सायन रुग्णालयात रुग्णांच्या बाजूला रुग्ण झोपले आहेत. हे भयंकर आहे. ही कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे. हा प्रकार लज्जास्पद आहे. (मुंबई: सायन हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल; BMC चे चौकशीचे आदेश)
We have constituted a committee to investigate the viral video and the report will be out in 24 hours: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) on viral video showing bodies kept next to patients at Sion hospital #Mumbai
— ANI (@ANI) May 7, 2020
Sion Hospital मध्ये मृतदेहांच्या बाजूला होत आहेत कोरोना रुग्णांवर उपचार; धक्कादायक व्हिडिओ - Watch Video
सोशल मीडियात सायन रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्य रुग्णांचा जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून आल्यावर अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी नुकतेच असे सांगितले होते की, कोविड-19 रुग्णांचा मृतदेह 30 मिनिटांच्या आतमध्येच वॉर्डचा बाहेर नेण्यात यावा. तसेच 12 तासाच्या आतमध्ये त्यावर अंतिमसंस्कार करणे अनिवार्य आहे.