
मुंबई मध्ये पालिका प्रशासनाच्या सायन हॉस्पिटलमध्ये कोव्हिड19 रूग्णांच्या वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या शेजारी मृतदेह पडल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. काल सायन हॉस्पिटलमधील घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी या गोष्टीचं राजकीय भांडवल देखील आहे. दरम्यान हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियामध्ये अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत 'अत्यंत लज्जास्पद' असा या प्रकाराचा उल्लेख केला आहे.
दरम्यान सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सायन हॉस्पिटलमधील कोव्हिड 19 च्या वॉर्डमध्ये किमान 5-6 मृतदेह उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या शेजारीच ठेवल्याचं पहायला मिळाले आहे. तर या मृतदेहांना काळ्या प्लॅस्टिकमध्ये गुंडाळले आहे. काहींवर ब्लॅंकेट, कपडा टाकल्याचं पहायला मिळालं आहे. COVID-19 च्या मृतदेहांच्या अंत्यविधीबाबत BMC कडून प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक नवाब मलिक यांच्या मागणीवरुन घेण्यात आले मागे.
सायन हॉस्पिटलमधील प्रकारानंतर सोशल मीडीयात संताप
नितेश राणे यांचा ट्वीटर वरील संंताप

दरम्यान काही वेळापूर्वी नितेश राणे यांनी ट्वीट करत सुरूवातीला फेक व्हिडीओ असल्याचं सांगत जबाबदारी झटकणार्या पालिका प्रशासनाने आता यावर खुलासा करत हॉस्पिटलच्या डीनने संबंधित नातेवाईकांनी मृतदेह स्वीकरण्यास नकार दिल्याचं कारणं पुढे केलं आहे. आता अशा बीएमसी प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवायची? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
अनेकांनी सायन हॉस्पिटलमधील या प्रकाराचा व्हिडिओ पाहून प्रशासनावर आपला राग व्यक्त केला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव अज्य मेहता यांनी जारी केलेल्या नोटमध्ये कोव्हिड 19 मुळे मृत्यू झाल्यास संबंधित मृतदेह 30 मिनिटांत वॉर्डबाहेर काढून 12 तासामध्ये अंत्यविधी करावेत असे आदेश दिले आहेत.