मुंबईतील सायन उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सायन मार्गावर वाहतुक कोंडी रोखण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले आहे. सायन उड्डाण पुलाचे काम उद्या (27 फेब्रुवारी) संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 2 मार्चच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे सायन उड्डाण पुल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबई (IIT Mumbai) यांच्या तर्फे करण्यात आले होते. त्यानुसार पुलाचे बेअरिंग बदलण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले होते.
सायन उड्डाण पुलावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे महत्व लक्षात घेऊन त्याचे काम पूर्ण करण्याकडे आता लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळेच सायन उड्डाणपुलावर ब्लॉक घेण्यात येत आहे. तर नागरिकांना व वाहन चालक यांना अहवान करण्यात येते की, मुंबई मध्ये प्रवेश करताना व मुंबई मधुन बाहेर जाताना पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्यामुळे प्रवास करताना सोईचे होईल असे वाहतूक पोलिसांकडून सुचना देण्यात आली आहे.(Mumbai Dangerous Bridge: नव्याने झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले 15 धोकादायक पूल; जाणून घ्या यादी)
पुलाच्या बेअरिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर एक्सपानशन जॉइंट बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गेल्या काही काळापासून पुलाच्या सुरक्षतेबाबतचा प्रश्न प्रवाशांकडून वारंवार उपस्थित केला जात होता. त्यानंतर आता अखेर या पुलाचे काम सुरु करण्यात येणार असून पुढील अडीच महिने काम चालणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.