Mumbai - Sindhudurg Direct Flight: 9 ऑक्टोबर पासून Alliance Air कडून मुंबई-सिंधुदुर्गदरम्यान थेट विमानसेवा; इथे पहा फ्लाईट शेड्युल, तिकिटाची किंमत
Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

कोकणवासियांचं बहुप्रतिक्षित सिंधुदुर्ग (Sindhudurg) मधील चिपी एअरपोर्ट (Chipi Airport) येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. या विमानतळावर Alliance Air ची विमानं उडणार आहेत. 9 ऑक्टोबर पासून चिपी एअरपोर्ट वर नियमित सेवा सुरू होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. ही विमानसेवा केंद्र सरकारच्या RCS Udan Scheme अंतर्गत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आता कोकणात विमानस्वारी उपलब्ध होणार आहे. Alliance Air हे विमान हे 70 सीटर असणार आहे. ATR 72 600 एअरक्राफ्ट मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणार आहे.

Flight 9I 661 हे मुंबई वरून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी झेपावणार आहे ते सिंधुदुर्ग मध्ये दुपारी 1 वाजता पोहचणार आहे. तर Flight 9I 662 हे सिंधुदुर्ग वरून दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी उडणार असून मुंबईला दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी येणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार विमानसेवेच्या उद्घाटनाला मुंबई-सिंधुदुर्ग फ्लाईटसाठी 2520 रूपये मोजावे लागणार आहेत तर सिंधुदुर्ग-मुंबई फ्लाईट साठी 2621 रूपये मोजावे लागणार आहेत. ही फ्लाईट तिकीट All-inclusive आहे.  यासाठी तिकीट आरक्षण आज 23 सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या airindia.in या अधिकृत वेबसाईटवर सुरू करण्यात आले आहे, तर 1 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्ग विमानतळावर आरक्षण खिडकी सुरु होईल. चिपी विमानतळाबद्दल '८' खास इंटरेस्टिंग गोष्टी.

 Alliance Air ट्वीट 

दक्षिणेला महाराष्ट्राचं टोक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी सध्या रस्ते आणि रेल्वे मार्ग देखील आहेत. रस्तेमार्ग सिंधुदुर्गात जाण्यासाठी मुंबई मधून अंदाजे 9 तासांपेक्षा अधिकचा वेळ लागतो. विमानसेवेमुळे मात्र तोच वेळ अवघ्या दीड ते दोन तासांवर येऊन ठेपणार आहे.

कोकणातले अनेक निळेशार समुद्र किनारे, पर्यटन स्थळं, खाद्यसंस्कृती यांचा आस्वाद घेण्यासाठी अनेकांची सिंधुदुर्गाकडे ओढ आहे. राज्यातील पर्यटन जिल्हा म्हणून देख़ील सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे.