कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे बंद असलेली मंदिरं दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली. नंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्यामध्ये दर्शनाची मुभा देण्यात आली. मुंबईमधील लोकप्रिय प्रभादेवी चं श्रीसिद्धिविनायक गणपती (Siddhivinayak Temple) मंदिर देखील आता भाविकांना सुरक्षेचे सारे नियम लक्षात ठेवत खुले झाले आहे. दरवर्षी नववर्षाच्या पहिली दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर आता 1 जानेवारी 2021 पासून सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रति तास 200 भाविकांची मर्यादा वाढवून 800 वर करण्यात आली आहे. Kangana Ranaut Visit Siddhivinayak Temple: अभिनेत्री कंगना रनौत ने बहिण रंगोली सोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, पहा हिरव्या रंगाच्या साडीतील मराठमोळा अंदाज.
सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची संख्या वाढवली असली तरीही क्यू आर कोड बंधनकारकच असेल. QR कोड असलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. गणपती बाप्पाची या काळात दर्शनाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 12.30 ते संध्याकाळी 7 तसेच रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत असेल. 1 तारखेला सिद्धीविनायकाचं दर्शन ऑनलाईन असेल. ऑफलाईन बंद ठेवण्यात येणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अॅपवरून क्यू आर कोड मिळवणं आवश्यक असेल. पण हा कोड अहस्तांतरित असेल म्हणजेच तुमच्या व्यतिरिक्त तो इतरांना दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे दर्शनाला येणार नसाल तर ती वेळ, नोंदणी रद्द करावी म्हणजे त्या वेळेचा वापर इतर भाविकांना करून देता येईल असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.