Kangana Ranaut Visit Siddhivinayak Temple: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नुकतीच तिच्या मूळ गाव असलेल्या मनालीहून बहिण रंगोलीसोबत मुंबईला परतली आहे. Thalaivi चित्रपटाचं शुटिंग संपल्यानंतर कंगनाने मनालीमध्ये कुटुंबासमवेत वेळ घालवला. गेल्या सोमवारी ती मुंबईत परतली आहे. कंगनाने आज बहिण रंगोलीसोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना रनौत हिरव्या रंगाच्या साडीत दिसली. तिच्या या मराठमोळ्या अंदाजाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी कंगनाने हिरवी साडी परिधान करत नाकात नथ आणि केसात गजरा माळला होता. तिचा हा पारंपारिक लूक सध्या सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कंगनाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या ट्विट अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे.
यात तिने म्हटलं आहे की, 'माझ्या प्रिय शहरात मुंबईत उभे राहण्यासाठी मला शत्रूचा सामना करावा लागला. त्यामुळे मी चकित झाले. आज मी मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. आता मला सुरक्षित, प्रेम आणि स्वागत मिळाल्यासारख वाटत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र!' (हेही वाचा - Kangana Ranaut ने शेअर केला Bikini Photo; नेटकऱ्यांनी केले ट्रोल (View Tweets))
The amount of hostility I faced for standing up for my beloved city Mumbai baffled me, today I went to Mumba devi and Shri Siddhivinayak ji and got their blessings, I feel protected, loved and welcomed. Jai Hind Jai Maharashtra 🙏 pic.twitter.com/sxT583P5w2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 29, 2020
कंगनाने हिरव्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. या साडीला सोनेरी बॉर्डर होती. तिने केसात सुंदर गजरा माळत पारंपारिक नथ घातली होती. या लूकमध्ये कंगनाचं सौदर्यं आणखी खुलल्याचं पाहायला मिळालं.
कंगनाचे हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो -
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा आगामी 'धाकड' चित्रपट नवीन वर्ष 2021 मध्ये येत आहे. या अॅक्शन चित्रपटामध्ये कंगना एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारत आहे. धाकड चित्रपटाशिवाय कंगना तेजस या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सेनानी पायलटच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.