Kangana Ranaut ने शेअर केला Bikini Photo; नेटकऱ्यांनी केले ट्रोल (View Tweets)

बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रनौत ही आपल्या बेधकड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता ती एका हॉट फोटोमुळे चर्चेत आली आहे. कंगना रनौत हिने आपला हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात तिने बिकिनी परिधान केली आहे.

Kangana Ranaut ने शेअर केला Bikini Photo; नेटकऱ्यांनी केले ट्रोल (View Tweets)
Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही आपल्या बेधकड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता ती एका हॉट फोटोमुळे (Hot Photo) चर्चेत आली आहे. कंगना रनौत हिने आपला हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात तिने बिकिनी परिधान केली आहे. समुद्र किनारी पाठमोरी बसलेली कंगना रनौत आपल्याला यात पाहायला मिळते. तिच्या या हॉट लूक मुळे तिला सोशल मीडियात प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आणि बॉलिवूड अशा अनेक गोष्टींवर तिने वादग्रस्त टिपण्णी केली आहे. विविध विषयांवरुन विविध व्यक्तींवर निशाणा साधणाऱ्या कंगना बिकिनी फोटोमुळे नेटकऱ्यांनी लक्ष्य केले आहे. (Kangana Ranaut Gets Rape Threats: हत्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा कंगना रनौत हिचा खुलासा, Watch Video)

संस्कारी क्विन, भक्तांची झाशीची राणी, तु भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहेस अशा अनेक कमेंट्स फोटोवर पाहायला मिळत आहेत. तसंच तुझे हे रुप पाहून भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले असेल अशा पद्धतीच्या कमेंट्सनेही तिची फिरकी घेण्यात आली आहे. यापूर्वी देखील अनेकदा विविध पोस्टमुळे कंगनावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता.

कंगना रनौत पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

ट्रोलिंग कमेंट्स:

दरम्यान, कंगना रनौत हिचा हा फोटो खूप जूना आहे. मेक्सिको मधील एका तुलुम नावाच्या आयलँड वर हा फोटो काढण्यात आला आहे. हा फोटो अत्यंत लक्षवेधी आहे. या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत असताना नेटकऱ्यांनी कंगनाला टार्गेट करण्याची संधी सोडली नाही.

(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2020 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).