मुंबई मध्ये 57 वर्षीय मतिमंद भावाचा खून केल्याच्या आरोपाखाली महिलेला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवार 8 मार्च दिवशी अंधेरी येथील आहे. आरोपी महिलेचं नाव Amarjeet Ahluwalia आहे. प्राथमिक पोलिस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, गतिमंद भावाचा सांभाळ करताना थकलेल्या महिलेने त्या त्रासामधून भावाचा जीव घेतला.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, महिलेने वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये हा टोकाचा निर्णय घेतला आहे. मृत व्यक्तीचं नाव Surender Ahluwalia आहे. हे भाऊ बहीण अंधेरी पश्चिम येथील मनिष नगर मध्ये राहत होते. हा खून शुक्रवारी सकाळी झाला आहे.
आरोपी महिला अमरजित अहुवालियाने भाऊ सुरेंद्र अहुवालियाचा खून चाकूने केला. नंतर त्याला गळफास लावला. त्यासाठी तिने स्वतःच्या दुपट्टाचा वापर केला होता. पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती शेजार्यांनी दिली. पोलिसांना अंदाज आहे की बहिणीने भावाचा खून आदल्या रात्रीच केला आहे. नक्की वाचा: Murder Case: बीड मधून धक्कादायक घटना, धाकट्या भावानेच केला मोठा भावाचा खून.
.पोलिसांच्या माहितीनुसार, महिला भाऊ सुरेंद्र सोबत राहत होती जो मानसिकरित्या अस्थिर होता. महिला अविवाहित होती. तिला कुटुंब नव्हते.बहिण मागील अनेक वर्षांपासून भावाची सेवा करत आहे. त्याचा संभाळ करता करता ती वैफल्यग्रस्त झाली होती. आरोपी महिलेने तिचा गुन्हा कबूल केला आहे.
डीएन नगरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 'लहानपणापासून सुरेंदर हा मतिमंद होता. त्याला एका लहान मुलाप्रमाणे सांभाळावं लागत होतं. कधी तो काहीच खात नव्हता तर कधी खूप मस्ती करून बहिणीला त्रास देत होता.' पोलिसांनी खूनामध्ये वापरण्यात आलेला चाकू आणि दुपट्टा ताब्यात घेतला आहे. आयपीसी च्या विविध कलमांखाली आरोपी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.