Murder Case: बीड मधून धक्कादायक घटना, धाकट्या भावानेच केला मोठा भावाचा खून

बीड मधील या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धाकट्या भावने मोठ्या भावाची हत्या केली आहे.

Murder Case: बीड मधून धक्कादायक घटना, धाकट्या भावानेच केला मोठा भावाचा खून
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Murder Case: बीड शहरातील एका स्मशनभुमीत पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळला. अज्ञात मृतदेहाची तपासणी करण्यात आली. मृतदेह सापडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलीसांनी काही दिवसांच्या आतच या प्रकरणाअंतर्गत आरोपीला अटक केली आहे. पोलीसांना चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. मयत तरुण हा आरोपीचा सख्खा भाऊ असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसही चक्रावले.मनोहर विलास पुंड असे मयत तरुणाचे नाव आहे. दर्शन पुंड असे आरोपीचे नाव आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात एका स्मशान भुमीजवळ दर्शन आणि त्याच्या तीन मित्रांनी मनोहर याला भरपूर मारहाण केली. या हल्लेत त्याचा मृत्यू झाला. मृतदेह जवळ पत्राच्या शेडमध्ये टाकून दिला. दरम्यान स्मशनाभुमीत मृतदेह असल्याची खबर पोलीसांना मिळाली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला आणि मृतदेह ताब्यात घेतला, मृतदेहाची उत्तर तपासणी केल्यावर त्याची हत्या केल्याची पोलीसांना माहिती मिळाली.

त्यामुळे पोलीसांनी हत्येची नोंद घेत कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलीसांनी काही तासांतच मृतदेहाची ओळख पटवत तपासणी सुरु केली. अवघ्या तीन तासांच्या आत पोलिसांनी आरोपींला अटक केली. चौकशी मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा सतत मद्यापान करत असायचा. लोकांकडून पैसे उदार घेवून दारू पिऊन घराच्यांना त्रास देत असायचा. त्यामुळे रोजच्या त्रासाला कंटांळून ृ दर्शनने आणि त्याच्या मित्राने मनोहरला मारण्याचे ठरवले. मनोहरला भरपूर मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळी दर्शनला बोलवण्यात आले परंतू त्याने येण्यास नकार दिला त्यामुळे पोलिसांना दर्शनवर संंशय आला. दर्शनला ताब्यात घेतल्यावर त्यांने सर्व काही घटना पोलीसांना सांगितली. मारहाणीत त्याचा जीव गेला असे आरोपीने पोलीसांना सांगितले. पोलिसांनी दर्शनसह त्याच्या तीन सहकार्य करण्याऱ्या मित्रांना देखील अटक केली आहे.

 

 

(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2023 12:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).