मुंबई मध्ये 61 वर्षीय व्यक्तीचं जॉगिंग (Jogging) करताना मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मरीन ड्राईव्ह (Marine Drive) मध्ये हा प्रकार घडला असून त्यांचा मृत्यू हार्ट अटॅक (Heart Attack) ने झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना रविवार 4 डिसेंबर दिवशी घडली आहे. दरम्यान ही व्यक्ती कोसळल्यानंतर नजिकच्या सैफी हॉस्पिटल (Saifee Hospital) मध्ये नेण्यात आले पण हॉस्पिटल मध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता असे हॉस्पिटल कडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजामध्ये या व्यक्तीचा मृत्यू हार्ट अटॅक मुळे झाला असावा असं नमूद करण्यात आले आहे. सैफी हॉस्पिटल मधून पोस्ट मार्टम साठी त्यांचा मृतदेह जीटी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आला होता. त्यानंतर तो त्यांच्या कुटुंबाकडे सोपावण्यात आला आहे.
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या व्यक्तीचा मृत्यू अपघाती निधन असं नोंदवून पुढील तपास कायम ठेवणार असल्याचं जाहीर केले आहे. दरम्यान मागील महिन्यात ऐन तारूण्यामधील अनेकांचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नक्की वाचा: Healthy Heart Tips: जीम मध्ये वर्कआऊट करताना फीटनेस फ्रीक लोकांनी टाळल्या पाहिजेत 'या' चूका; अन्यथा हार्ट अटॅक चा धोका!
मुंबईत हळूहळू हिवाळा जाणवू लागला आहे. हिवाळ्याच्या दिवसांत हार्ट अटॅकचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे या दिवसांत थंडीपासून रक्षण करण्यासाठी पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. आहारात, दैनंदिन जीवनात त्यानुसार बदलही करणं गरजेचे आहे.