Dead| Photo Credit - Pixabay

मुंबई मध्ये अपहरण आणि खूनाच्या अजून एका घटनेचा सुगावा लागला आहे. 22 वर्षीय सदिच्छा साने (Sadichha Sane) एमबीबीएस चं शिक्षण घेणार्‍या मुलीच्या अपहरण आणि हत्येची कबुली Mittu Sukhdev Singh याने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, Mittu Sukhdev Singh हा मुलीच्या गायब होण्यामधील प्रमुख आरोपी होता. त्याने आपला गुन्हा कबुल केल्याचं सांगितलं जात आहे. 30 नोव्हेंबर 2021 दिवशी त्याने खून करून मृतदेह समुद्रामध्ये फेकल्याचं सांगितलं आहे.

सिंग हा मुंबई मधील वांद्रे भागाचा रहिवासी आहे. पोलिसांनी Mittu Sukhdev Singh आणि त्याचा सहकारी Jabbar Ansari याला अटक केली आहे. त्यांच्याविरूद्ध कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दरम्यान पोलिसांनी 13 जानेवारीला दोघांना अपहरणाच्या गुन्ह्याखाली अटक केली होती.

Swadichcha Sane या 22 वर्षीय मुलीचं अपहरण झालं होतं. ती शेवटची लाईफगार्ड सोबत दिसली होती. त्याच्यासोबत तिने सेल्फी देखील क्लिक केला होता.

सानेच्या मृतदेहाचा शोध पोलिस करत होते. बॅन्डसॅन्ड परिसरात त्यासाठी फायर ब्रिगेड आणि स्थानिक मच्छिमारांची देखील आपण मदत घेत होतो असे पोलिस म्हणाले. पण 2021 मध्ये मृत्यू झाल्याने आता तिचा मृतदेह सापडणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती असेही पोलिस सांगतात.

पोलिसांनी यापूर्वी नार्को अ‍ॅनलिसिस आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट केली होती. सिंग याची नागपाडा पोलिस हॉस्पिटलमधील ही तपासणी फार सकारात्मक निकाल देणारे नव्हते.

साने ही सर जे जे हॉस्पिटल ची तिसर्‍या वर्षाची एमबीबीएस ची विद्यार्थिनी होती. 29 नोव्हेंबर 2021 दिवशी ती सकाळी 9.58ला विरार स्थानकात चढली आणि अंधेरीला उतरली. त्या दिवशी दुपारी 2 वाजता तिची प्रिलिम्स होती. अंधेरीहून ती दुसर्‍या ट्रेन मध्ये चढून वांद्रे ला उतरली. तेथून रिक्षाने ती वांद्रे बॅन्डसॅन्ड भागात आली होती.