Mumbai: मध्य रेल्वेसाठी रविवार (3फेब्रुवारी) हा इतिहासातील अत्यंत भयंकर दिवस होता. तर सात प्रशावांचा सात तासांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच मध्य रेल्वेप्रशासानासाठी ही गंभीर बाब असल्याचे म्हटले जात आहे.
पहिला अपघात हा ठाणे-डोंबिवली-ऐरोली मार्गावर रविवारी सकाळी 6 वाजता घडला. त्यामध्ये एक प्रवासी ठाणे-मुलुंड दरम्यान रेल्वेरुळ ओलांडत असताना त्याला रेल्वेने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. तर दुसरा अपघात सकाळी 8 वाजता ठाणे-ऐरोलीच्या मध्ये एका 50 वर्षीय वृद्धाला लोकलचा जोरात धक्का लागल्याने मृत्यू झाला.
मात्र घडलेल्या अंतरापासून काही अंतरावर 9 वाजताच्या सुमारास 20 वर्षीय राहुल चौहान या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी राहुल हा ठाणे स्थानकातून रेल्वेरुळ ओलांडून जात असताना ट्रेनच्या जोरदार धडकेत त्याचा मृत्यू झाला आहे.
तर आकाश नावाच्या 40 वर्षीय तरुण घटकोपर ते नालासोपारा व्हाया ठाणे मार्गावरुन प्रवास करत होता. त्यावेळी ठाणे स्टेशन क्रमांक 5 वर आकाशचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या घटनेमागील कारण आकाशाने सुरु झालेल्या ट्रेनसाठी धाव घेतल्याने त्याचा रेल्वेखाली जाऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
एवढेच नसून कोपरखैराणे येथे एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. 26 वर्षीय प्रिती राणे, तिचा 2 वर्षीय मुलगा लिवेश आणि नातेवाईक सुनिता बांगले अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर हे तिघेही रेल्वेरुळ ओलांडून जात असताना रेल्वेने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे.