मुंबईत (Mumbai) मोनो रेल्वेसाठी (Mono Railway) पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा दरम्यान अद्याप काम सुरु आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे रविवार (3 मार्च) पासून धावणार आहे. तर या मोनो रेल्वेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fandnavis) यांच्या हस्ते होणार आहे.
महालक्ष्मी येथील संत गाडगे महाराज चौक येथील स्थानकावर या मोनो रेल्वेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या रेल्वेचा मार्ग 19.54 किमी लांबीचा असणार आहे. त्याचसोबत चेंबूर ते महालक्ष्मी पर्यंत प्रवास करण्यासाठी जवळजवळ 1 तासापेक्षा अधिक वेळ लागत होता. परंतु आता दुसऱ्या टप्प्यातील मोनो सुरु होणार असल्यामुळे त्यासाठी फक्त 30 मिनिटे लागणार आहेत. तर सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मोनो रेल्वे दर 22 मिनिटांनी धावणार आहे.
या मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यात जीटीबी नगर,अॅण्टॉप हिल,वडाळा ब्रिज, आचार्य अत्रे नगर, दादर पूर्व, आंबेकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल आणि संत गाडगे महाराज चौक ही स्थानके असणार आहेत.