Mumbai School Update: मुंबईतील 12 वी पर्यंतचे वर्ग येत्या 2 मार्च पासून ऑफलाइन पद्धतीने सुरु होणार
School Reopen | Representative image (PC - Wikimedia Commons)

Mumbai School Update: देशात जेव्हा पहिल्यांदा मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर महापालिने सर्व शाळा, महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थांना ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र आता कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होण्यासह निर्बंध सुद्धा हटवले जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता येत्या 2 मार्च पासून 12 वी पर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त आजार किंवा एखादी वैद्यकिय समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना यामधून वगळले जाणार आहे.(Russia Ukraine Crisis: युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या अडचणीत वाढ, राज्यांचे केंद्राला मदतीचे आवाहन)

शुक्रवारी कॅबिनेट मंत्री आदित्या ठाकरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर 2 मार्च पासून ऑफलाइन पद्धतीने वर्ग पूर्णपणे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सध्याचे वर्ग ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने सुरु आहेत. मात्र पूर्णपणे शाळा आणि महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने कधी सुरु करणार या निर्णयाची सर्वांकडून प्रतिक्षा केली जात होती.(Mumbai University घेणार ऑनलाईन परीक्षा, फार्मसी, इंजिनियरिंग सारखे प्रोफेशनल कोर्स असतील अपवाद)

ठाकरे यांनी ट्विट करत असे म्हटले की. कोविडपूर्वी ज्या वेळेनुसार शाळा सुरु होतील. तसेच उपस्थिती, शाळेच्या बस आणि एक्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटी सुद्धा घेतल्या जातील. तर महापालिकेच्या नव्या गाइडलाइन्सनुसार, प्रत्येक वर्गात मास्क अनिवार्य असणार आहे. फक्त शाळेच्या एखाद्या अॅक्टिव्हिटी किंवा मैदात तो घातला नाही तरीही चालेल.  त्याचसोबत विद्यार्थ्यांचे तापमान तपासावे. लंच ब्रेक सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेने द्यावा.