Mumbai University घेणार ऑनलाईन परीक्षा, फार्मसी, इंजिनियरिंग सारखे प्रोफेशनल कोर्स असतील अपवाद
mumbai university (pic credit - mumbai university twitter)

महाराष्ट्र राज्य बोर्ड यंदा कोविड 19 च्या दहशतीखालीच दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार आहे मात्र मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. मुंबई विद्यापीठात सार्‍या विषयाच्या परीक्षा या ऑनलाईन माध्यमातून होणार आहेत. Board of Examiners कडून नुकताच त्याचा निर्णय घेण्यात आला असून सार्‍या महाविद्यालयांना त्याचं पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान परीक्षेसाठी एक सुधारित नियमावली देखील जारी करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांबाबतच्या अधिकृत परिपत्रकानुसार, पहिल्या सत्राच्या परीक्षा (मार्च/एप्रिल, २०२२), ज्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर पदवी इत्यादींसाठी फॉर्म सबमिट केले आहेत, त्याच विद्यार्थ्यांसाठी असतील. कॉलेजला आता विद्यार्थ्यांची माहिती, ज्यात संपर्क क्रमांक, इमेल आयडी सह काही तपशीलांसह डेटा बेस बनवण्याचाही सूचना आहेत.  नक्की वाचा: HSC Exams Timetable Update: बारावीच्या 5 आणि 7 मार्चचे पेपर पुढे ढकलले; जाणून घ्या नव्या तारखा.

मुंबई विद्यापीठ परीक्षांबाबतची नियमावली काय सांगते?

1. ऑनलाईन परीक्षांसाठी सध्या कॉलेजला नीट प्लॅनिंग करण्याच्या सूचना आहेत.

2. युनिव्हर्सिटी परीक्षांसाठी सीट नंबर दिले जातील.

3.ज्या विषयाच्या इंटरनल परीक्षा असतील त्यांचे मार्क्स ऑनलाईन स्वरूपात 11 एप्रिल पर्यंत अपडेट करावे लागणार आहेत.

4.विशिष्ट क्लस्टर मधील परीक्षा या एकत्रच घ्याव्या लागणार आहेत.

5. ट्रेडिशनल डिग्री कोर्स मध्ये नियमित आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्लॅन बनवणं आवश्यक आहे.

6.Traditional Postgraduate Courses च्या सत्र 2 आणि 4 च्या परीक्षांचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकाही पाठवल्या जाणार आहेत.

मुंबई विद्यापीठ प्रोफेशनल कोर्स ज्या मध्ये इंजिनियरिंग, लॉ, फार्मसी, एमसीए यांचा समावेश होतो अशा परीक्षा ऑफलाईन मोड मध्येच घेणार आहे. दरम्यान कोविड संकटामुळे मागील 2 वर्षात या विद्यार्थ्यांसाठी ही पहिल्यांदा ऑफलाईन परीक्षा असणार आहे.

ऑफलाइन परीक्षांमध्ये सविस्तर उत्तरांसाठी प्रश्न आणि बहुपर्यायी प्रश्नांचे मिश्रण असेल. descriptive प्रश्नावलीची उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील.