Mumbai School-College Reopen: आजपासून शाळा, महाविद्यालये सुरु होणार, 'या' नियमांचे करावे लागणार पालन
School Reopen | Representative image (PC - Wikimedia Commons)

Mumbai School-College Reopen:  राज्यभरासह आजपासून मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत. त्यानुसार 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरु केले जाणार आहेत. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिकेकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्याचे पालन करत शाळा आणि महाविद्यालयातील वर्ग सुरु केले जाणार आहेत.(Western Railway: पश्चिम रेल्वेच्या 30 रेल्वे स्थानकांवर 2,729 कॅमेरे बसवण्यात येणार)

शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेच. पण कोरोनाची परिस्थिती पाहता त्याची चिंता सुद्धा सतावत आहे. शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तर या काही नियमांचे पालन करुन शाळेसह महाविद्यालयात प्रवेशासाठी परवानगी असणार आहे.(Schools Reopen in Thane: ठाण्यातील शाळाही 4 ऑक्टोबरपासून सुरु)

-वर्गात एका बाकावर एक विद्यार्थ्याला बसण्यास परवानगी असणार

-शाळेत मुलाला पाठवण्यासाठी पालकांनी संमतीपत्र द्यावे

-एका दिवशी 15-20 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार

-सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागणार

-कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असणार

दरम्यान, आतापर्यंत 70 टक्के शिक्षकांचे लसीकरण झालेले आबे, तर शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहिमसुद्धा राबवली जाणार आहे. ग्रामीण विभागात 5-12 वी चे वर्ग आणि शहरात 8-12 वी चे वर्ग आजपासून सुरु होणार आहेत. मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी ज्या पालकांकडून परवानगी नाही त्यांना सक्ती करु नये असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.