मुंबईच्या (Mumbai) कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) रेल्वे स्टेशनवर एक घटना घडली जी पाहून तुम्ही थक्क व्हाल. एलटीटी रेल्वे स्थानकातून (LTT Railway Station) गोरखपूर एक्सप्रेस (Gorakhpur Express) रवाना होत असताना चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला. प्रवासी व्यक्ती काही काळ ट्रेनसोबत खेचत गेला पण एका आरपीएफ (RPF) जवानाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. या घटनेचा CCTV फुटेज आज समोर आले आहेत ज्यामध्ये ही घटना स्पष्टपणे दिसून येत आहे. मध्य रेल्वेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये स्पष्ट दिसून येते की एक्सप्रेस ट्रेन सुरु झाल्यावर एक व्यक्ती चालत्या ट्रेनच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न करतील होता. (Fake ID Cards वापरुन Mumbai Locals मधून प्रवास करणाऱ्या 2,018 प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचा दणका; 10 लाखांचा दंड वसूल)
यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील रिक्त जागेत अडकला. ट्रेन त्याला आपल्या सोबत खेचतानाही दिसत आहे. त्याचवेळी RPF जवान मिलिंद पठारे आणि प्लॅटफॉर्मवरील काही प्रवासाच्या प्रयत्नांमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचवला जातो. ही घटना काल, म्हणजे 7 जून रोजी घडलेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यूजर्स रेल्वे संरक्षण बलाच्या त्या जवानाला त्याच्या शौर्यासाठी सलाम करत आहेत.
दि. 07.06.2021 को एलटीटी रेलवे स्टेशन से गोरखपुर एक्स के रवाना होते समय एक यात्री चलती ट्रेन में चढ़ते समय अपना संतुलन खो बैठा व गाडी की चपेट में आने वाला था तभी RPF आरक्षक मिलिंद पठारे ने तुरंत यात्री को खींच कर बचा लिया । कृपया, यात्री चलती ट्रेन न पकड़े। pic.twitter.com/n3XqAgCzCE
— Central Railway (@Central_Railway) June 7, 2021
दरम्यान, मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर चालती एक्सप्रेस ट्रेन किंवा लोकल ट्रेन पकडताना प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घातलेल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. घाईघाईत ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी आपला तोल गमावतात ज्यामध्ये अनेकदा त्यांचा तर अन्य प्रवाशांचाही जीव धोक्यात येतो.