Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,179 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,45,805 वर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 1,179 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,45,805 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये 917 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,17,268 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये एकूण 20,554 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 7,655 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बीएमसीने (BMC) ने याबाबत माहिती दिली. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 26 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते.

त्यातील 21 रुग्ण पुरुष व 11 रुग्ण महिला होत्या. 1 जणांचे वय 40 वर्षा खाली होते. 24 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 7 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के आहे. 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.83 टक्के आहे. 29 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 7,68,818 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 84 दिवस झाला आहे.

एएनआय ट्वीट -

सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 30 ऑगस्ट नुसार मुंबईमधील सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 567 इतकी आहे व सक्रिय सीलबंद इमारती 6,171 इतक्या आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरस लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सरकारने काही नियमांमध्ये शिथिलता आणली.  यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे, 100% क्षमतेने हॉटेल्स आणि लॉज चालवण्याची परवानगी दिली गेली आहे. तसेच आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी/मान्यता/ई-परमिटची आवश्यकता नाही.