प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आता लवकरच रेशन कार्डधारकांना (Ration Card) महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्यासाठी आल्यास त्यांना रास्तभावाने धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबद्दल एक परिपत्रक तयार करण्यात आले असून त्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

मात्र सध्या शहारात किंवा ग्रामीण भागात ठराविक दिवसानंतर ग्राहकांना रेशन दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी या प्रकाराबद्दल तक्रार केली होती. तसेच विधानसभेती सदस्यांनीसुद्धा या तक्रारांबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

(खुशखबर! आता मुंबई मधील खड्डे बुजणार 24 तासांत; फक्त पाठवावा लागेल फोटो, जाणून घ्या WhatsApp Number)

त्यामुळेच आता रेशन कार्डधारकांना रास्त भाव दुकानदानात महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य दिले जाणार आहे. परंतु दुकानदाराने कार्डधारकांना धान्य न दिल्यास त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा करण्यात येणार आहे.