Mumbai Rains Water Logging (Photo Credits: ANI)

Mumbai Rains Update: मुंबई मध्ये आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. उपनगरात सुद्धा अधून मधून पावसाच्या मुसळधार सरी बरसत आहेत. मुंबईतील सखल भाग म्हणजेच हिंदमाता (Hindmata) आणि किंग्स सर्कल (Kings Circle) भागात लगेचच पाणी सुद्धा साचले आहे. बीएमसीचे (BMC) कर्मचारी या भागात पाणी उपसण्याचे काम करत आहेत. येत्या काही तासात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, अशावेळी नागरिकांनी घरीच थांबावे, समुद्र किनाऱ्याजवळ अजिबातच जाऊ नये असे आवाहन बीएमसी तर्फे करण्यात आले आहे. पुढील 24 ते 48 तासांसाठी मुंबई सह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे, मुंबई मध्ये आज संध्याकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी 3 .28 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या 24 तासात, डहाणू 128 mm, कुलाबा 121.6 mm,सांताक्रुज‌ 96.6 mm, रत्नागिरी 101., miअलिबाग 122.6 mi इतका पाऊस झाल्याचे सुद्धा समजत आहे.

हिंदमाता भागात पाणी साचले, फोटो

किंग्स सर्कल जलमय, पहा फोटो

अंंधेरी मध्ये पाणीच पाणी

दरम्यान, मुंबई हवामान खात्याच्या माहितीनुसार, जुलै महिन्यासाठी अपेक्षित असणारा 100 टक्के पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. काल पर्यंत मुंबईत एकूण 822 मिमी पावसाची नोंद झाली आहे.