Mumbai November Rain | Photo Credits: Twitter

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता 'महा' हे चक्रीवादळ जोर धरायला लागलं आहे. दिवसेंदिवस 'महा' चक्रीवादळ वेगवान होत असल्याने ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर महिन्यातही ढगाळ वातावरणासह पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवल्या अंदाजानुसार आज मुंबई शहर आणि पुण्यात रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील काही दिवस पावसाचा धोका कायम असल्याने मुंबई आणि पुणेकरांनी सतर्क राहण्याचे आदेश हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. पुढील चार तास पुणे, मुंबई, नाशिक आणि रायगड मध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.  Maharashtra Weather Forecast: कोकण, गोवा सह महाराष्ट्रात पुढील 48 तास पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज.

मुंबई शहर परिसरात दक्षिण मुंबईमध्ये चर्चगेट, मरिन लाइन्स येथे तर दादर, परळमध्येही पावसाच्या काही काळ दमदार सरी पहायला मिळाल्या. पावसला वैतागलेल्या मुंबईकरांनी नोव्हेंबर महिन्यातील पावासाचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मुंबई मध्ये पावसाच्या सरी

दमदार पाऊस

नोव्हेंबर महिन्यात मुंबईकारांनी अनुभवला पाऊस

मुंबईप्रमाणेच आज पुण्यातही पावसाने हजेरी लावली आहे. पुढील 48 तास पाऊस दमदार कोसळणार असल्याने पुणेकरांनी सावध राहण्याचा इशारा कालच हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. परतीचा हा रेंगाळलेला पाऊस 7 नोव्हेंबर पर्यंत महराष्ट्रात बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने मच्छीमारांसोबतच, शेतकरी आणि सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.