Mumbai Rains: सांताक्रूझ परिसरात पावसाची जोरदार हजेरी; अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ (Watch Video))
Photo Credit - X

Mumbai Rains: मुंबई (Mumbai Rain)सह, ठाणे, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. सांताक्रूझ परिसरात पावसाने जोरदार हजेरी(Heavy rain in Santacruz)लावली. मोठ्या कालावधीनंतर पाऊस पडल्याने मुंबईकर चांगलेच सुखूवले आहेत. पावसाचा आनंद ते व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करून व्यक्त करत आहेत. मात्र, अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. बदलापूर आणि वांगणी परिसरात वेगाने वारे वाहत आहेत. (हेही वाचा:Thane Rain: बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह बरसला अवकाळी पाऊस; नेटिझन्सनी कॅमेऱ्यात कैद केले खास क्षण (Watch Videos) )

आज मुंबई, ठाण्यासह डोंबिवली, परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, दुपार पासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसापूर्वी परिसरात धुळीचे वादळ आले होते. धुळीच्या वादळामुळे काही काळ दृश्यमानता कमी झाली होती. वारे जोरात वाहू लागल्याने झाडे उन्मळून पडण्याची शक्यता शहरात अनेक भागात आहे.

पहा पोस्ट