Mumbai Traffic Updates: मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये अधून मधून केवळ काही सरींची बरसात करणारा पाऊस 23 जुलै पासून पुन्हा दमदार कोसळायला सुरूवात झाली आहे. मुंबईमध्ये सध्या 23 जुलैच्या रात्रीपासून कोसलळार्या पावसामुळे हिंदमाता, सायन यारख्या सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. मुंबई महानगर पालिकेकडून पाणी उपसायला सुरूवात झाली आहे मात्र दरम्यान सामान्य मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणी ट्राफिक डायव्हर्जन करण्यात आली आहेत. बीएमसीने त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर करण्यात माहितीनुसार भेंडी बाजार, गांधी मार्केट (किंग्ज सर्कल) सह 5 ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे.
मुंबईमध्ये रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू असल्याने महत्त्वाची कामं असणार्या मुंबईकरांसाठी दिलासा आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा किमान 10-15 मिनिटं उशिराने धावत आहे. मुंबई पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबईमध्ये कोणत्या परिसरात वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत?
Traffic Diversion Updates #Monsoon2019 #MCGMUpdates #MumbaiRains #SafeMonsoon pic.twitter.com/0x4T4t605D
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 24, 2019
23 जुलैच्या रात्रीपासून कोसळाणार्या पावसामुळे कुलाबा येथे 24 च्या सकाळपर्यंत 171मिमी तर सांताक्रुजमध्ये 58 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.