सध्या मुंबईसह उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबई आणि उपनगरात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील 3 दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवाखान खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबईत पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी रात्रीपासूनच्या सततच्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तर दुसरीकडे वसई, नालासोपारामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. 

कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी नद्यांच्या पातळीत वाढ झाली असल्याने येथील गावक-यांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

ठाणे शहरात पुढील चार तास मुसळधार पावसाची शक्यता: मुंबई वेधाशाळेचा अंदाज

मुंबईमध्ये अधून मधून दमदार पावसाची सर बरसत असली तरीही अद्याप रेल्वे सेवा सुरळित आहे. पश्चिम रेल्वेवर वाहतुक सुरळीत असल्याचं ट्विट करण्यात आलं आहे.

मुंबईमध्ये दादर, सायन, हिंदमाता, परेल यासारख्या भागात पावसाच्या सरी बरसत असल्याने वाहतूक मंदावली आहे. सखल भागात अद्याप पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवरही गाड्यांचा वेग मंदावला आहे. तर सायन रेल्वे रूळ अद्याप पाण्याखाली आहेत. 

मुंबई वेधशाळेने दिवसभरात मुंबई आणि उपनगरात पुढील काही तासांमध्ये पुन्हा दमदार पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

असल्फा भागामध्ये वाल्मिकी नगर झोपडपट्टीवर 8-10 झोपड्यांवर कोसळली दरड आहे. पोलिस, पालिका प्रशासन आणि अग्निशमन दल सध्या बचावकार्य करत आहेत. या भागातील इतर झोपड्या रिकाम्या करण्याचं काम सुरू आहे.

Load More

Mumbai Rains and Traffic Update: मुंबईमध्ये काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा दमदार कोसळायला सुरुवात झाली आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरात 23 जुलैच्या संध्याकाळ पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज 24 जुलैच्या सकाळी रात्री पासून कोसळत असलेल्या पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकरांची वाहतूक मंदावली आहे. रेल्वे सेवा सुरळीत असल्याने अनेक मुंबईकरांनी पहाटेच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे सेवा देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच सध्या बाहेर पडण्याचा निर्णय चाकरमनी मुंबईकर घेत आहे.

मुंबई वेधशाळेप्रमाणे स्कायमेटनेही पुढील काही दिवस मुंबई सह महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी धुव्वादार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई मध्ये यंदाही २६ जुलैला दमदार पाऊस असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हिंदमाता,  सायन  यासारख्या  सखल  भागात गुडघा भर  पाणी  साचले  आहे.