Rainfall in Mumbai City | File Photo (Photo Credit: ANI)

मुंबईकरांचा सारा आठवडा गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये गेला. मात्र त्यासोबतच मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा धूमाकूळ सुरू असल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. मागील काही तास अधून मधून बरसणारा पाऊस या आठवड्याच्या विकेंडलाही मुंबईकरांच्या पाठीशी आहे. आज मुंबईसह महाराष्ट्रात गौरी-गणपतीचं विसर्जन आहे. मात्र सध्या मुंबईत पुन्हा धुव्वाधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तावलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तास मुंबईमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. Mumbai High & Low Tide During Ganesh Visarjan 2019 Days:  जाणून 3-13 सप्टेंबर दरम्यान भरती आणि ओहोटी यांचे वेळापत्रक

गुजरात ते केरळ या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही तास मुंबई सह पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये मागील 6 तासांत मुसळधार पाऊस कोसळल्याची माहिती देखील हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी केले आहे. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

के. एस. होसाळीकर ट्वीट

होसाळीकर यांच्या ट्वीटनुसार, कुलाबामध्ये 72 तर पनवेल मध्ये 67.4 मीमी पाऊस मागील 24 तासात बरसला आहे. आज नागपूरमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शाळा, कॉलेजेस सह कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.