मुंबईसह उपनगरात आज पावसाने जोर धरलेला दिसून आला. उद्यासुद्धा मुंबई, ठाणे आणि पालघर येथे अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याने हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज पडल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश सखल ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले आहे. याच दरम्यान आता मुंबईतील नळ बाजार मधील गोल देऊळ येथे अतिमुसळधार पावसामुळे वॉटर लॉगिंग झाले आहे.(Mumbai Rain Update: दादर मधील हिंदमाता भागात मुसळधार पावसामुळे वॉटर लॉगिंग, Watch Video)
गोल देऊळ येथे पावसाचे पाणी साचल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा गुडघाभर पाण्यातून चालत जावे लागत आहेत. प्रत्येक वर्षात शहरातील सखोल भागात पावसाचे पाणी साचल्याचे दिसून येते. परंतु महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि वॉटर लॉगिंग संबंधित काम करण्यात येते.(Mumbai Rains: मुंबई मध्ये जोरदार पावसाला सुरूवात; पुढील 48 तास जोर कायम राहण्याची शक्यता)
Maharashtra: Waterlogging in Null Bazar area of Gol Deul in Mumbai, following heavy rainfall in the city. pic.twitter.com/S9gMH0nLXS
— ANI (@ANI) July 3, 2020
मुंबईला अति पावसाचा देण्यात आलेला इशारा पाहता पालिकेकडून सखल भागात फार काळ पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. ठिकठिकाणी पंपिंग मशीन सज्ज ठेवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र पाऊस अधूनमधून येऊन जात होता. अजुनही शहरात जोरदार पाऊस झालेला नाही. अचानक पाऊस दडी मारत असल्याने मागील आठवड्यात अनेक मुंबईकर उकाड्याने वैतागले होते.