Monsoon 2019 (Photo Credits: PTI)

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळी मुंबई सह ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. तसंच मुंबईतील सायन, कुर्ला, अंधेरी, बोरीवली, भायखळा या भागांमध्येही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढील दोन तासांत मुंबई सह ठाण्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ठाणे जिल्हातील भिवंडी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे.

ANI ट्विट:

त्याचबरोबर नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, बेलापूर, खारघर भागांतही दमदार पर्जन्यवृष्टीत सुरु आहे. आज शनिवार असल्यामुळे अनेकांना सुट्टी असेल. मात्र आजही ऑफिसवर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला रेल्वेच्या खोळंब्याला सामोरे जावे लागणार आहे. कारण मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी उशिराने सुरु आहे.

मात्र विकेन्ड एन्जॉय करण्यासाठी मस्त वातावरण निर्माण झाले असून मुंबईकर हा पाऊस आणि अल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी नक्कीच घराबाहेर पडतील.