मुलुंड स्थानकात लोकलवर कोसळलेले झाड हटवले; खोळंबलेली मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु
Tree Branches fallen on Local at Mulund Station (Photo Credits: ANI)

मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने ओव्हरहेट वायर तुटून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे सकाळी घाईच्या वेळेस प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र लोकलवर कोसळलेल्या झाडाच्या फांद्या हटवण्यात आल्या असून मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करत दिली आहे. (मुलुंड: झाड पडून ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत)

ANI ट्विट:

ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने सीएसएमटीकडून कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. तसंच धीम्या मार्गावरील लोकल्स जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. डाऊन दिशेच्या लोकल वाहतुकीवर परिणामाचा फटका अप दिशेच्या लोकल्सलाही बसण्याची शक्यता होती.

मात्र रेल्वे प्रशासनाने लोकलवर पडलेले झाड हटवल्याने वाहतूक पूर्ववत झाली असून यामुळे  प्रवाशांचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होईल.