मुलुंड: झाड पडून ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Central Railway Mumbai | (Photo Credits: Archived, Edited, Representative image)

पावसाने जोर धरल्यापासूनच मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे वाहतूक कोलमडून पडली आहे. आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने सीएसएमटीकडून कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड स्थानकातल्या फलाट क्रमांक 1 वरील ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने धीम्या मार्गाच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. सकाळच्या वेळेस ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांची घाई, त्यात पाऊस आणि रेल्वेचा झालेला खोळंबा यामुळे प्रवाशांना गर्दीला आणि इतर त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

झाड पडल्याने धीम्या मार्गावरील लोकल्स जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. परिणामी डाऊन दिशेच्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचा फटका अप दिशेच्या लोकल्सलाही बसणार आहे.

मुलुंड रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या लोकलवर झाड कोसळले. त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.