Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई मध्ये लोकल ही प्रवाशांसाठी लाईफलाईन आहे. पण अनेक जण या ट्रेन मध्ये स्टंटबाजी करत आपले प्राण धोक्यात घालतात. असाच एक प्रकार काल मुंबईमध्ये झाला आहे. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान कळव्याचा एक 18 वर्षीय मुलगा मुंबई लोकलला लटकून प्रवास करताना खांब्याला आदळला आणि जखमी झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार तो मोटार कोचला लटकून अन्य 2 प्रवाशांसोबत प्रवास करत होता.

जखमी प्रवाशाचं नाव दानिश झकीर हुसैन खान आहे. तो 18 वर्षांचा आहे. कळव्याच्या एका झोपडपट्टीमध्ये राहणारा दानिश मजूर म्हणून काम करतो.

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर दादरला येणार्‍या ट्रेनमध्ये लटकून करणारा प्रवासी कोसळला. ही घटना 9.30 च्या सुमारास कल्याण स्थानकाजवळ घडली आहे. दानिश पडल्यानंतर 15 मिनिटांतच त्याला मदत मिळाली आणि त्याला कळवा च्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर दानिश ला सिग्नल पोलचा धक्का लागला आणि त्याच्या हाताची ग्रिप सुटली व तो तोल जाऊन खाली कोसळला. जीआरपी च्या माहितीनुसार दानिशच्या कुटुंबाने 20 मिनिटांत धावाधाव करत त्याला रिक्षा मध्ये टाकून हॉस्पिटल गाठलं. वांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं .

ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांकडून वारंवार स्टंटबाजी टाळण्याचं, लटकून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.