
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai Pune Expressway) आज (28 मार्च, गुरुवार) दोन तासांसाठी बंद राहणार आहे. एक्स्प्रेसवेवर ओव्हरहेड गँट्रीजचं काम सुरु असल्याने महामार्ग दुपारी 12-2 या वेळेत बंद राहील. या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे येणारा मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
मुंबईच्या दिशेने येणारा मार्ग दुपारी 2 तासांसाठी बंद राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी दिली. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी 12-2 या दरम्यान एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खालापूरच्या NH4 हायवे या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी देखील एक्स्प्रेस वे वर सुरु असलेल्या कामामुळे मार्ग अनेकदा वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.