Highways Image used for representational purpose | (Photo Credits: File Photo)

मुंबई - पुणे महामार्गावर (Mumbai - Pune Expressway) दरड काढण्याच्या कामासाठी 12 मार्च ते 20 मार्च 2019 दरम्यान मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. मुंबई - पुणे महामार्गावर खंडाळा (Khandala) बोगद्याजवळ कि.मी. 46.710 ते 46.579 दरम्यान ढिले झालेले दरडीचे दगड काढण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडुन हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक मंदावणार आहे. मुंबई - पुणे रस्त्यावर दरड काढण्याचं काम सुरू असताना वाहतूक 15 मिनिटं थांबवाण्यात येणार आहे.

12-20 मार्च 2019 दरम्यान कोणत्या वेळेत घेतला जाईल ब्लॉक?

पहिला ब्लॉक :- सकाळी 10 ते सकाळी 10.15

दुसरा ब्लॉक :- सकाळी 11 ते सकाळी 11.15

तिसरा ब्लॉक :- दुपारी 12 ते दुपारी 12.15

चौथा ब्लॉक :- दुपारी 2 ते दुपारी 2.15

पाचवा ब्लॉक :- दुपारी 3 ते दुपारी 3.15

दरड काढण्याचं काम करताना पुणे व मुंबई या मार्गावरील वाहतूक दिवसातून 5 वेळेस 15 मिनिटांसाठी पूर्णपणे थांबवली जाईल. 15 मार्च दिवशी दुपारी 3.15 वाजल्यापासून 18 मार्च दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक सुरू असेल. प्रवाशांनी या मेगा ब्लॉकचा विचार करून प्रवास करताना वेळेचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.