मुंबई-पुणे शहराला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग मुंबई-पुणे एक्सप्रेस (Mumbai-Pune Express Way)वे आज (9 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 2 या वेळेत बंद राहणार आहे. काही तांत्रिक कामानिमित्त या मार्गावरील वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने सांगितले आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक 12 ते 2 या वेळेत बंद राहणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आल्याने एक्स्प्रेस वे बंद असणार आहे.
या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची जड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी 52 किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
हेदेखील वाचा- Helicopter BLADE ची मुंबई-पुणे, मुंबई -शिर्डी सेवा ऑक्टोबर महिन्यापासून होणार सुरू
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणा-या या पर्यायी मार्गांचा विचार करुन प्रवास करावा असेही सांगण्यात येत आहे. या आधी 26 सप्टेंबरला काही तांत्रिक दुरुस्तीच्या मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
तसेच 16 एप्रिल ते 5 मे 2019 मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सर्वात मोठा म्हणजे 15 दिवसांचा मेगाब्लॉक ठेवण्यात आला होता. शनिवार-रविवा हा सुट्टीचा दिवस वगळता 15 दिवसांचा मेगाब्लॉक होता. अमृतांजन ब्रिज येथे किमी नं. 45/710 ते 45/900, आडोशी येथे किमी 40/780 ते 40/995, खंडाळा येथे किमी 46/935 ते 47/910 आणि भातन बोगदा येथे 46/935 ते 47/910 येथे रस्त्यांच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक ठेवण्यात आहे.