Blade-Helicopter (Twitter)

अमेरिका (America) येथील ब्लेड (BLADE) कंपनीने 9 महिन्यांपूर्वी भारतात (India) हेलिकॉप्टर टॅक्सी (Helicopter-Taxi) सेवा देणार असल्याची घोषणा केली होती. मुंबई ते पुणे (Mumbai To Pune) आणि मुंबई ते शिर्डी (Mumbai To Shirdi) असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे, असे सांगितले होते. यानुसार, भारतात ऑक्टोंबर महिन्यापासून ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. सध्या मुंबई ते पुणे अशी सेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच पुढील काही दिवसांतच मुंबई- शिर्डी या दरम्यान सेवा सुरु करण्यात येईल, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित दत्ता (Amit Datta)यांनी सांगितले आहे. या हेलिकॉप्टर टॅक्सीचे भाडे अद्याप ठरवले गेले नाही. परंतु येत्या काही दिवसातच याबदल निर्णय घेवू, असे दत्ता म्हणाले आहेत.

भारतात अमेरिकेतील ब्लेड कंपनीला 3 शहरात हेलिकॉप्टर सेवा देण्याची परवागनी मिळाली आहे. हेलिकॉप्टर टॅक्सीची सेवा आठवड्यातील 6 दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार अशी सेवा देण्यात येणार आहे. सध्या सर्वप्रथम मुंबई ते पुणे ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, प्रवाशांना अगोदर या सेवेची बुकींग करावी लागणार आहे. जर जागा शिल्लक असेल तरच प्रवाशांना तत्काळ प्रवास करता येईल. प्रवाशांची ने- आण करण्यासाठी सध्या 3 हेलिकॉप्टर टॅक्सी आहेत. तसेच एकावेळी केवळ 5 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. मुंबई येथील महालक्ष्मी पासून पुण्यातील मुंढवापर्यंत असा प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. बस किंवा खाजगी वाहनांतून प्रवास करताना प्रवाशांना 2 ते 3 तास वाट बघावी लागत आहे. परंतु या हेलिकॉप्टर टॅक्सीच्या मदतीने केवळ ३५ मिनिटात हे अंतर गाठता येऊ शकते. हे देखील वाचा- मुंबईमध्ये OLA, Uber ची प्रवासी वाहतूक विमान प्रवासापेक्षा महाग; नागरिक त्रस्त

Fly BLADE चे ट्विट-

ब्लेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, अमित दत्ता म्हणाले की, या हॅलिकॉपर टॅक्सी प्रवासाचे भाडे अद्याप ठरवले गेले नाही. लोकांच्या मागणीनुसार याचे भाडे ठरवले जाईल. भारतात Electric vertical take-off आणि landing (eVTOL) या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. सध्या भारतामध्ये VVIP मंडळींना, पर्यटनासाठी, निवडणूक दौऱ्यादरम्यान, देवदर्शनासाठी खास चार्टर विमान उपलब्ध आहेत. सध्या राज्यात Pawan Hans, Global Vectra Helicorp, Heligo charters, Himalayan Heli Services, United Heli Charters, या कंपनी हेलिकॉप्टरची सेवा देत आहेत.