Mumbai Pune Express Landslide: मुसळधार पावसाने ठिकठिकाणी दगड कोसळल्याचे चित्र दिसत आहे. इर्शाळवाडीत मुसळधार पावसाने दरड कोसळ्याचे घटना ताजी असताना, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील (Mumbai Pune Express Higway) आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रात्रीच्या २२.२५ दरम्यना ही घटना झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यामुळे रस्त्यावरिल वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. मुख्यता मुंबईला येणारी वाहतुक सेवा बंद करण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. या दरड कोसळली घटने कोणतेही जीवितहानी झाली नाही.
मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुक सेवा बंद केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठं मोठे दरड विखरलेले आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रात्रभर मुसळधार पावसाने दरड कोसळला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या समोर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेवून काम सुरु करायला घेतले आहे. पावसाच्या धारा सतत चालू असल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहे.आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी उपस्थित असून लगदा काढण्याचे काम सुरु आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळ तिन्ही लेनवरची वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. पुण्यातील ओडोसी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या तीन लेन यामुळे बंद आहेत. महामार्ग वाहतूक यंत्रणेच्या वतीने मार्गिका बदलण्याचं काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीपासून रस्त्या सुरळीत करण्यासाठी काम चालू आहे. प्रवाशांना वाहतुकीचे आदेश देण्याचे काम चालू आहे. पोलिस घटनास्थळी ठप्प झालेली वाहतुक सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहे.