BMC (File Image)

मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित ठेवलेली मालमत्ता कर (Property Tax) वाढ यावर्षी लागू करु शकते. यामुळे आधिच महागाईमुळे होरपळलेल्या मुंबईकरांना आणखी संकटाचा सामना हा करावा लागणार आहे. 2023 ते 2025 या दोन वर्षांसाठी करवाढ करण्याची तयारी मुंबई महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. सुमारे 15 टक्के इतकी करवाढ प्रस्तावित आहे.  या कर आकारणीच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी सनदी लेखापालाच्या नियुक्तीचा निर्णय देखील महानगर पालिकेकडून घेण्यात आला आहे. (हेही वाचा - Zika Case in Mumbai: मुंबई मध्ये झिका वायरसची दुसरी रूग्ण 15 वर्षीय मुलगी)

मुंबई महानगर पालिकेकडून प्रत्येक पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ ही केली जाते. 2015 मध्ये मुंबई महानगर पालिकेकडून मालमत्ता कर वाढ ही करण्यात आली होती. यानंतर 2020 मध्ये अपेक्षित असलेली करवाढ कोरोनाच्या संकटामुळे टाळण्यात आली. 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही करवाढ रोखली. आता या वर्षी मालमत्ता करात वाढ करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने कंबर कसली आहे.

मालमत्ता करवाढ जमिनीचे बाजार मूल्य किंवा इमारतीच्या भांडवली मूल्यावर एक एप्रिल 2023 रोजी अंमलात असलेल्या रेडीरेकनर दरावर आधारित असणार आहे. म्हणजे मुंबईतील त्या त्या भागातील रेडीरेकनर दरानुसार कर निश्चित करण्यात येणार आहेत. सनदी लेखापालाच्या आर्थिक अभ्यास अहवालानंतर ही करवाढ अपेक्षित असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.