मुंबई: पवई येथे हनुमान टेकडी परिसरात घराचे छप्पर तुटून हरीण खाली कोसळले; वन्य विभागाच्या अधिकार्‍यांनी केली सुटका(Watch Video)
Deer Crashes House Roof in Mumbai. (Photo Credits: Twitter)

मुंबईच्या पवई (Powai) परिसरातील एका घराच्या सिमेंटच्या छप्परावरून घसरुन चक्क एक हरीण (Deer) घरात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या ट्विटर वर पाहायला मिळत आहे. आज रविवारी 10 मे रोजी मध्यरात्री 12.30  च्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये हरीण किंवा घरातील रहिवासी कोणालाही इजा झालेली नाही. पवई मधील हनुमान टेकडी (Hanuman Tekdi) मागील डोंगरात जंगली प्राण्यांचे वास्तव्य आहे. अनेकदा या जंगलातील प्राणी या भागात आढळून येतात. मात्र बेसावध असताना रात्रीच्या वेळी चक्क घरातच हरीण कोसळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. ठाणे शहरातील रस्त्यांवर फिरतोय Leopard? जाणून घ्या 'या' Viral Video मागील सत्य

प्राप्त माहितीनुसार, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून याबद्दल माहिती देण्यात आली. हनुमान टेकडी परिसरातील जंगलात या हरिणाच्या पाठी बिबट्या लागला होता, त्याच्यापासून वाचण्यासाठी हरीण घराच्या छतावर उतरून पळू लागले. मात्र यावेळी घसरून ते चक्क घरातच कोसळले. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये हे घर आणि त्यात पडलेले हरीण दिसून येत आहे.

पवई येथे घरात कोसळले हरीण, पहा व्हिडीओ

दरम्यान, स्थानिकांनी वन्यविभागाला माहिती दिल्यावर त्वरित घरातून हरणाची सुटका करण्यात आली,इथून हे हरीण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत, हरिण कोसळताना चार ते पाच जण घरात झोपले होते. मात्र सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही.