नागपाडा: निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळल्याने दुर्घटना; बचाव कार्य सुरू
नागपाडा येथील दुर्घटनेमध्ये 2-3 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईत आज सकाळी धारावी (Dharavi) मध्ये निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळल्यानंतर आता नागपाडा (Nagpada) भागातील निर्माणाधीन इमारतीचा (Under Construction Building) देखील भाग कोसळला आहे. पीअर खान स्ट्रीट (Peer Khan Street ) येथे आज ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये ढिगार्यात 2-3 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई: धारावी येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी
ANI ट्विट
#Mumbai: Portion of a slab of an under construction building collapsed at Peer Khan Street in Nagpada, today; 2 to 3 people likely to be trapped under debris, 3 fire engines, a rescue van and an ambulance at the site.
— ANI (@ANI) April 15, 2019
नागपाडा येथील दुर्घटनास्थळी बचावासाठी 3 फायर इंजिन, बचावासाठी गाडी, अॅम्ब्युलंस पोहचली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2019 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

