Dharavi Building Collapsed (Photo Credits-ANI)

मुंबई: धारावी (Dharavi) येथील पीएमजीपी (PMG) कॉलनीमध्ये इमारतीचे बांधकाम सुरु असून त्या इमारतीचा भाग कोसळला असल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. तर कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेय यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

पीएमजीपी कॉलनीतील एका व्यक्तीने असे सांगितले की, बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग एका रिक्षाचालकावर कोसळल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ANI ट्वीट:

दुर्घटना घडली त्यावेळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी बचावकार्य सुरु केले. तसेच मोटरसायकल वरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला सुद्धा यामध्ये दुखापत झाली असल्याने त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.