मुंबई पोलिसाच्या पत्नीने मांडली व्यथा, 'पतीला श्वसनाचा त्रास होतोय मात्र कोरोना रिपोर्ट हाती नसल्याने हॉस्पिटल सहकार्य करत नाही' (Watch Video)
Mumbai Police Waiting For Coronavirus Test Report (Photo Credits: Twitter/Ram Kadam)

कोरोना विरुद्धच्या (Coronavirus) लढ्यात मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील कर्मचारी दिवसरात्र एक करून लढत आहेत मात्र जेव्हा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची वेळ येते तर त्यात हॉस्पिटलचे सहकार्य लाभत नाहीये अशा शब्दात मुंबई पोलिसातील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam)  यांनी या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओ मध्ये महिला सांगत असल्या प्रमाणे पोलीस दलातील हे कर्मचारी (नाव गुप्त) काही दिवसांपासून आजारी आहेत, त्यांना ताप होता , त्यांची रक्तचाचणी केली असता त्यात टायफाईडचे निदान झाले मात्र कालपासून त्यांना श्वसनात सुद्धा त्रास होत आहे. या लक्षणांना पाहता त्यांची आणि कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र या चाचणीचे अहवाल समोर यायला 48 तासांचा अवधी लागतो मात्र तेवढ्या वेळात कोणतेही हॉस्पिटल त्यांना उपचारांसाठी दाखल करून घेण्यास तयार नाही. Coronavirus In Maharashtra: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

महिलेने या व्हिडीओ पुढे सांगितले की, सरकारी हॉस्पिटल मध्ये पतीला दाखल करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक ठिकाणी बेड च उपलब्ध नाहीत असे सांगितले जातेय. काही ठिकाणी बेड असूनही कोरोना रुग्णांसाठी राखीव असल्याचे सांगत जोपर्यंत कोरोनाचा हवाल समोर येत नाही तोपर्यंत दाखल करून घेतले जाणार नाही असे सांगितले जातेय. खाजगी रुग्णालयात 80 हजार ते 1 लाख रुपये खर्च सांगितला जातोय जो देणे आम्हाला शक्य होणार नाही, अशावेळी प्रत्येक तास पुढे सरकत असताना जीव गमावण्याची भीती आहे तरी सरकारने या मध्ये लक्ष घालावे अशी विनंती या महिलेने केली आहे. Coronavirus चा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सांगितली सर्व राशींना लागू होईल अशी भविष्यवाणी, पाहा आजचे राशिभविष्य

तुम्ही व्हिडीओ मध्ये बघू शकता हे पोलीस दलातील कर्मचारी संपूर्ण कव्हर होऊन जमिनीवर झोपले आहेत, त्यांचे शरीर अनेकवेळा थरथरताना दिसून येते. अशावेळी त्यांना योग्य ती मदत मिळण्यासाठी किती वाट पाहायची? त्यांचा जीव असा देवाच्या भरवश्यावर सोडून देणे योग्य आहे का? असे प्रश्न राम कदम यांनी केले आहेत.

राम कदम ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात पोलीस दलातील तब्बल 2562 महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.याचबरोबर आतापर्यंत एकूण 33 महाराष्ट्र पोलिस कोरोनामुळे दगावल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.