Coronavirus चा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सांगितली सर्व राशींना लागू होईल अशी भविष्यवाणी, पाहा आजचे राशिभविष्य
Maharashtra Police | (File Photo)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 30 जूनपर्यंत देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा हा पाचवा टप्पा असला तरीही महाराष्ट्रात (Maharashtra) राज्य सरकारच्या काही नियमांसह अनलॉक होणे सुरु झाले आहेत. काही नियम शिथील करण्यात आले असून हळूहळू महाराष्ट्र पूर्वपदावर येईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे लोकांनी आवेशात येऊन राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन करु नये तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियमांचे पालन करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) जनतेची भविष्यवाणी सांगितली आहे. हे भविष्य प्रत्येक राशीतील व्यक्तींना लागू असून असून यावर तुमचे भवितव्य अवलंबून आहे.

लोकांनी कोरोनाच्या भीतीने भविष्याची चिंता करण्यापेक्षा राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केले तर तुमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल असे महाराष्ट्र पोलिसांचे म्हणणे आहे. दिलासादायक! महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एकाही पोलिसाला कोरोनाची लागण नाही; COVID-19 पॉझिटिव्ह महाराष्ट्र पोलिसांच्या मृतांचा आकडा 33 वर

पाहा काय आहे ती भविष्यवाणी

या भविष्यवाणीत तुम्हाला जीवन जगण्याची अपेक्षा असून ती पूर्ण करण्यासाठी काही चांगेल कर्म करावे लागतील. यात आवश्यक नसताना घराबाहेर पडू नका, नियमितपणे हात धुवा, बाहेर गेलात तर मास्क लावा, कुठल्याही राशीच्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवा असे केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहिल.

महाराष्ट्रात असून सद्य घडीला राज्यात एकूण 80,229 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 2849 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 35,156 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 42 हजार 215 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.