मुंबई पोलिसांची ओळख ही त्यांची कर्तव्यतत्परता आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी वेळेत त्याची उकल केल्याची उदाहरणं ताजी असताना आता अजून एक तसंच एक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये पोलिसांनी हरवलेल्या मुलाला तासभरात शोधून पुन्हा त्याच्या कुटुंबाकडे दिले. ट्वीटर अकाऊंट वर त्यांनी पालकांसोबत मुलाचा फोटो शेअर करत पोलिस कर्मचार्यांच्या पाठीवर थाप दिली आहे. शिवडी पोलिस स्टेशन मधील ही घटना आहे.
पहा ट्वीट
आज शिवडी पोलीस ठाणे येथे एक मुलगा हरवला असल्याची तक्रार मिळताच व.पो.नि. सुरेश सहाने, पो ना विनोद मोटे आणि पो ना संकेत कांबळी यांनी एका तासात अथक प्रयत्न करून त्याला शोधून काढले व त्याच्या आईच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले.#MumbaiCaseFiles pic.twitter.com/2yR1lm1WGU
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) January 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)