पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच उद्घाटन झालेला शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतू नागरिकांसाठी खुला झाला आहे. अटल सेतू म्हणून या मार्गाला नाव दिले गेले आहे. दरम्यान, या सेतूवर वाहन रोखून थांबण्यास तसेच दुचाकी आणि तिनचाकी वाहनांना परवानगी नाही. असे असले तरी या मार्गावरुन एका रिक्षाचालकाने रिक्षा चालवल्याचा दावा केला जात आहे. @saravnan_rd या एक्स हँडलवरुन या ऑटोरिक्षाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे खरोखरच ऑटोरिक्षा या मार्गावर येऊ लागल्या आहेत का? याबातब प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)