Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शहरात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा-मोटर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर फुगे यांच्या उड्डाणावर 30 दिवसांची बंदी लागू केली आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी (ऑपरेशन्स) विशाल ठाकूर यांनी हा आदेश जारी केला आहे. जो प्रतिबंधात्मक असून 20 डिसेंबर 2023 ते 18 जानेवारी 2024 पर्यंत लागू असणार आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी किंवा समाजकंटक देशविरोधी कारवाया करण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचे पाऊल म्हणून हा निर्णय (Mumbai Police Bans Drones) घेण्यात आला आहे. व्हीव्हीआयपींना लक्ष्य करण्यासाठी, सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अशा उडणाऱ्या वस्तू घात ठरु शकता. त्यामुळे पोलिसांनी हे आदेश जारी केल्याचे म्हटले आहे.

संबंधितावर कायदेशीर कारवाई

फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 144 अन्वये, आदेश मुंबई पोलिसांनी केलेल्या हवाई निगराणी किंवा पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स), मुंबई यांच्या विशिष्ट लेखी परवानगीचा अपवाद वगळता उल्लेख केलेल्या वस्तूंच्या कोणत्याही उड्डाण अथवा कृतींना पुढचे काही दिवस प्रतिबंध करणयात आला आहे. अशा प्रकारची कृती करताना आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाणर आहे.

दंड अथवा शिक्षेची कारवाई

मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, लागू करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करताना आढळलेल्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र आहे. प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे ही सुरक्षा बळकट करण्यासाठी केली जाणारी नियमीत आणि सामान्य कृती आहे. नागरिकांनी त्याला सहकार्य करावे.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवांच्या अनुषंघाने सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. खास करुन मुंबई सारख्या शहरांमध्ये लोक नव्या वर्षाचे स्वागत आणि ख्रीसमस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. अशा वेळी समाजकंटक त्याचाच फायदा घेऊन समाजविघातक कृती करु शकतात. अशा वेळी उत्सवादरम्यान सुरक्षित आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी पोलीस कटीबद्ध असल्याने आवश्यक ती कारवाई आणि निर्णय घेतले जातात. त्यातूनच पुढील तीस दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई शहरात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा-मोटर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर फुगे यांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. जर काही आवश्यक कामासाठी ही उड्डाणे करायची असल्यास पोलिसांची अधिकृत परवानगी घ्यावी लागणार आहे.