Gun Shot | Pixabay.com

Mumbai Shocker: मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या सेंच्युरी म्हाडा कॉलनीमध्ये पोलिस कॉन्स्टेबलच्या (Police Constable) मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे त्याने वडिलांच्या सर्व्हिस पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. संतोष म्हस्के असे वडिलांचे नाव आहे. तर, हर्ष संतोष म्हस्के असे 21 वर्षीय मुलाचे नाव आहे. ही घटना प्रभादेवी (Prabhadevi) येथील सेंच्युरी मिल म्हाडा इमारतीतील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली. घटनेवेळी संतोष म्हस्के हे बाहेर होते. घटनास्थळी पोलिसांना (Mumbai Police)कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. त्याशिवाय, हर्षने रिव्हॉल्व्हर कशी काय वापरली? याचा तपास पोलीस करत आहेत. (Shreyas Talpade and Alok Nath booked: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, कारण घ्या जाणून)

वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:

टेली मानस (आरोग्य मंत्रालय) – 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड – 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन – 080-456 87786; आयकॉल – 022-25521111 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे) – 0832-2252525