Mumbai Police constable Amol Kamble | (PC - Instagram)

मुंबई पोलीस (Mumbai Police) आपल्या कठोर शिस्त आणि कर्तव्यपालनासाठी देशभर प्रसिद्ध आहेत. पण, ते आपल्या ऑफ-ड्यूटी हटके अंदाजासाठीही प्रसिद्ध आहेत. सोशल मीडिया आणि खास करुन इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेले अमोल कांबळे नावाचे पोलीस हवालदारही असेच नेहमी चर्चेत असतात. अमोल कांबळे (Mumbai Police Havildar Amol Kamble) हे त्यांच्या कर्तव्यपालनासोबतच ऑफ ड्युटी असताना त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या डान्स व्हिडिओंमुळे सोशल मीडियात चर्चेत असतात. त्याच्या काही व्हिडिओंची तर बॉलिवूड सेलेब्रीटींनीही दखल घेतली आहे. ज्यात रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि फरहान खान यांच्यासारख्या दिग्गजांचाही समावेश आहे. यातीलच काही व्हिडिओ आम्ही येते देत होत.

अमोल कांबळे विविध मंचावरुन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगतात की, त्यांना नृत्याची पहिल्यापासूनच आवड होती. परंतु त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते पोलीस सेवेत रुजू झाले. पोलिस अधिकारी झाल्यानंतर त्यांनी नृत्य करणे पूर्णपणे बंद केले कारण त्यांनी पोलीसी शिस्त आणि कर्तव्ये यांकडे लक्ष दिले. दरम्यान, सोशल मीडियाच्या उदयानंतर कांबळे पुन्हा आपल्या जोशात आले. अमोलचा मोठा भाऊ कोरिओग्राफर आणि प्रोफेशनल डान्सर आहे. ज्याचा त्यांना सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करताना फायदा झाला.

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Kamble (@amolkamble2799)

मुंबई पोलीस दलात हवालदार असलेले अमोल कांबळे सांगतात की, ते TikTok वर होते आणि त्याचे जवळपास 1 लाख फॉलोअर्स होते. मात्र, लॉकडाऊन कालात टिकटॉक अॅपवर बंदी आली. नंतर त्यांनी इंस्टाग्रामवर रँडम डान्सचे व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. अमोल कांबळेचे सोशल मीडियावर 169 हजार फॉलोअर्स आहेत. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. ते नृत्याचे व्हिडिओ आणि कधीकधी मजेदार सामग्री (कंटेट) देखील शेअर करतात.

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Kamble (@amolkamble2799)

अमोल कांबळे यांनी रणवीर सिंग सोबत असलेल्या रीलपैकी एक व्हिडिओ पिन केला. व्हिडिओमध्ये दोघेही एक छोटासा डान्स आणि अभिनय करताना दिसत होते. व्हिडिओला 79K पेक्षा जास्त लाईक्स आणि चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ते वेळोवेळी अनेक ट्रेंडिंग डान्स व्हिडिओ करताना दिसतो. ते फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंगसोबत एका शोमध्येही दिसला होते.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेकदा अमोल कांबळे ट्रोलही होतात. त्यामुळे नेटीझन्स त्यांना अनेकदा सोशल मीडियापेक्षा आपल्या कर्तव्यावर लक्ष देण्यासही सांगतात. पण, यावर बोलताना अमोल कांबळे स्पष्ट करतात की, आपण प्रथम कर्तव्यपालनासच प्राधान्य देतो. त्यानंतरतच आपण केवळ छंद म्हणून सोशल मीडियावर रिल्स, अथवा व्हिडिओ बनवतो. प्रथम येते आणि तो त्याच्या पासच्या वेळेत हे व्हिडिओ बनवतो.