Mumbai Police: नवनीत राणा यांच्या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दाखवला आरसा, थेट व्हिडिओच केला शेअर
Navneet Rana | (Photo Credits: Twitter)

आपण अनुसूचित जातीचे असल्याने मुंबई पोलिसांकडून आपल्याला भेदभावाची वागणूक दिल्याची तक्रार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे केली. या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्त सजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी नवनीत राणा यांचे आरोप खोडून काढले आहेत. संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी एक व्हिडिओच ट्विट करत या राणा यांच्या आरपांचा प्रतिवाद केला आहे. या व्हिडिओत राणा पती पत्नी दोघेही आरामात चाहा घेत पोलिसांशी बोलताना आणि अत्यंत सामान्य वर्तन करताना दिसत आहेत. त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आरोपात किती तथ्य आहे, याच्या सत्यतेवरच टीका होऊ लागली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर हनुमान चालिस पटण करण्याच्या हट्टाला पेटलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना अखेर अटक झाली. प्रक्षोभक विधाने करणे आणि त्यातून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. या दरम्यानच, पोलिसांकडून आपल्याला योग्य ती वागणूक मिळाली नसल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले होते. दरम्यान, संजय पांडे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत आम्हाला 'आणखी काही बोलायची आवश्यकता आहे का?' कॅप्शनही ट्विटला दिली आहे. (हेही वाचा, Navneet Rana: राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जाणून घ्या ताज्या घडामोडी)

ट्विट

नवनीत राणा यांनी म्हटले होते की, मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पटण करण्यापूर्वीच पोलिसांनी 23 तारखेला मला अटक केली. त्यानंतर त्यांनी मला खार पोलीसस्टेशनमध्ये रात्रभर ठेवले. मी पिण्यासाठी अनेकदा पाणी मागत होते. मात्र तेदेखील मला मिळाले नाही. तसेच, मला वॉशरुमलाही जाऊ दिले नाही. मी अनुसुचित जातीची असल्याने तुम्हाला आमच्या भांड्यातून पाणी मिळणार नसल्याचेही तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितले. पोलिसांकडून माझ्या जातीवरुन झालेला हा सरळसरळ अपमान आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.